STORYMIRROR

परेश पवार 'शिव'

Romance

3  

परेश पवार 'शिव'

Romance

लाजला चांदवा..

लाजला चांदवा..

1 min
218

ही गुलाबी हवा.. भास होतो नवा..

ओठ भांबावले.. त्यात हा गारवा..

धुंद आवेग हा.. मंद झाला दिवा..

अंबरी तो पहा.. लाजला चांदवा..


आज का रात ही.. मंद धुंदावली..

मी सख्या रे तुझी.. मी तुझी सावली..

श्वास हे पेटले.. ये जरा साजणा

तूच रे भैरवी.. तू सख्या पूरिया..


काजळाने तुझ्या.. मोहिनी घातली..

पाहता मी तुला.. का सखे लाजली..?

का तुझा श्वास हा.. छेडतो मारवा..

अंबरी तो पहा.. लाजला चांदवा..


तापली यामिनी.. चांदणे पाहता..

जीव मेणापरी.. आग ही लागता..

नाचतो सारखा.. या मनी पारवा..

तूच रे भैरवी.. तू सख्या पूरिया..


ही अशी वेळ की.. जाणिवा तापल्या..

तार झंकारती.. अंतरी आपल्या..

होतसे भेट ही.. सोड बाकी खुणा..

देह वेडावले.. शांतता शोधण्या..


तूच ती भैरवी.. तू सखे पूरिया..

तूच रे भैरवी.. तू सख्या पूरिया..

अंबरी तो पहा.. लाजला चांदवा..

अंबरी तो पहा.. लाजला चांदवा..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance