STORYMIRROR

परेश पवार 'शिव'

Romance

3  

परेश पवार 'शिव'

Romance

गुन्हा

गुन्हा

1 min
338

गुन्हा हा कितीक गहिरा,

नयनीच्या खाणाखुणा..

लाजणाऱ्या पापण्यांचा,

खेळ चाले तो जुना..


आरक्त होई पाहता तू,

होती अनावर भावना..

मोरपिसासम स्पर्शिता तू,

मनी कल्लोळ जाहला..


उन्मादा आली भरती..

नजर देही फिरविता..

आवेगाने फडफडे पहा..

हृदयपक्षी बापुडा..


चुंबिता तू देह माझा

शहारते हे मन पुन्हा..

अधराशी अधर भेटता

पुन्हा पुन्हा घडतो गुन्हा..


अलवार फुंकर घातली,

पाठीवरी या गोमट्या..

दाह रे वणव्यापरी..

चेतला.. देह पेटला..


तापल्या श्वासांत या..

देह हे गंधाळले..

ज्योत धगधगली स्वतः..

अन् पतंगाही जाळले..


चांदणे पिऊन ओले..

शिंपीत मोती सांडला..

चंद्रही ढगाआड गेला,

पाहता प्रणय सोहळा..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance