STORYMIRROR

परेश पवार 'शिव'

Others

3  

परेश पवार 'शिव'

Others

मुशाफिरी

मुशाफिरी

1 min
143

एक उमेद वेडी हसते, पण बोलत नाही काही..

दशदिशा पुकारती मजला, मज वाटून ऐसे राही..


मन काळोखाच्या रात्री, एक ससाच भित्रा होई...

मिटलेले डोळे घट्ट, न उघडून साधा पाही..


मन थेंब थेंब अभ्रातील, मन तरंग पाण्यावरती..

मन नाही रिक्त रकाना, मन नदी असे बारमाही..


मन जाई जुई मोगरा, मन गुलाब अन् गुलबक्षी..

मन मनास जास्वंदीच्या, देवाचे चरणी वाही..


या अंगणी शक्यतांच्या, मन घर बांधे कौलारू..

आशेने लिंपत बसते, त्या निर्जीव भिंतींनाही..


ही मुशाफिरी या मनाची, संपूच नये असे वाटे..

दशदिशा जरी फिरलो मी, उरतेच ना बाकी काही..


Rate this content
Log in