STORYMIRROR

परेश पवार 'शिव'

Romance

4  

परेश पवार 'शिव'

Romance

तिचा रंग

तिचा रंग

1 min
545

तिचा रंग ऐसा, गव्हाळी गव्हाळी..

ओढ्याच्या काठी, लव्हाळी लव्हाळी..


डाळिंबाची ओठी, डहाळी डहाळी..

रूप, कांती, बांधा, नव्हाळी नव्हाळी..


तिचा रंग गहिरा, सदा पावसाळी..

सखी रानफूल, हिवाळी उन्हाळी..


रुतून राहिली ती, जिव्हाळी जिव्हाळी..

काळजात भरली, शहाळी शहाळी..


तिचा स्पर्श व्हावा, सकाळी सकाळी..

पहाटेच्या कानी, भूपाळी भूपाळी..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance