STORYMIRROR

काव्य रजनी

Tragedy

3  

काव्य रजनी

Tragedy

रात्र

रात्र

1 min
11.5K

लहानपणी रात्र कशी 

अगदी लवकर यायची 

थकलेल्या मला कशी 

पटकन निजवायची


कळू लागले तशी

रात्र ही शांत झाली

तिला मला जणू

स्वतःची ओळख मिळाली


तरूण झाले तेव्हा 

रात्र कशी रोमांचित होई

रातराणीच्या वासानं 

ती धुंद होऊन गाई


संसाराच्या धावपळीत 

चैन रात्रीची हरपली

काळजीने ग्रस्त रात्र 

उशीराने झोपू लागली


स्वप्नाळू रात्र फार काळ 

नाही स्वप्नात रमली

वास्तवाच्या जाणिवेने 

दचकून वारंवार उठली


कोसळण्याऱ्या दु:खानी 

रात्र जरी पुरती भिजली

मायेची चादर घेऊन 

मला गुरफटून झोपली


कधी रात्र विनाकारण 

माझी चिंता करते

मलाही नाही झोपू देत 

आणि स्वतः उगाच जागते


आजकाल रात्र पूर्वीसारखी 

वाटत नाही खुशीत

येत नाही जवळ आणि 

घेत नाही मला कुशीत


माहित आहे मला, रात्र 

चिरकाल टिकणार आहे

केव्हा तरी कायमचं झोपून      

मी तिला मुकणार आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy