भन्न ऊन
भन्न ऊन


भन्न दशदिशांच्या उन्हात दुपारी
चिमण्यांचा थकला चिवचिवाट
पांघरूण माया झाड सावल्यांची
अर्धजागी आळसावते वाट।।
उन्हाचे चालूच होरपळणे
सावल्यात सुस्त कुत्रे, रवंथणारी गाय
सावकाश सरपटणाऱ्या सावल्यात
कुणी भिजवितात करपले पाय।।
कुठे कॅप अन् स्टायलिश गॉगल
कुठे घामेजलेला देह ओढे चप्पल तुटलेली
गावाकाठचे उदास आटलेले तळे
तळ्यात कमळं निपचित हिरमुसलेली
ऋतू सारेच करपीत राहिली उन्हं
सुकल्याओठी विरली गाणी ऊनच ऊन।।