पाऊस
पाऊस
असाच असतो तो पाऊस,
मन ओलावून टाकतो।
पहिला थेंब पडतो तो,
अंग मोहरून टाकतो।
सोडल्या जातात होड्या,
अन खेळला जातो खेळ।
मी मात्र घालत बसते,
तुझ्या माझ्या नात्याचा मेळ।
तू असतोच नेहमी सोबत,
कधी मनाने,कधी शब्दांने।
पण भेटत मात्र नाहीस मला,
अंतर राखतोस प्रेमाचे।
आज मात्र पाऊस आला,
तुझी आठवण आल्यावाचून राहिली नाही।
तू तर केव्हाच गेला होतास हे,
माहीत असूनही पापणी कोरडी राहिली नाही।
रडून घेतले मनसोक्त,
त्या पहिल्या पावसाच्या साक्षीने।
तू तर येणारच न्हवतास,
हे सांगितले होते मनाने।