शांतता
शांतता
शांत असे आज,
मनातली धडधड।
भास तुझा मला,
आता होत नसे।
कठोर मन हे झाले,
विरल्या त्या संवेदना।
नाते तुझे नि माझे,
आता काय राहिले।
प्रश्न सारे संपले आता,
उत्तरे कधी मिळाली नाहीत।
एका प्रश्नाचे उत्तर कधी,
तू मला दिलेच नाही।
सोडला आता तो ध्यास,
मनी न राहिली तुझी आस।
मुके झाले ते हृदय,
कुणी जीवनी नसे खास।
पूर्वी तूच होतास माझं जगणं,
मी तुझ्याचसाठी जगायची।
आता मात्र मी ठरवले,
तुझी आठवण नाही काढायची।
आधी प्रेम होते माझे,
तू कधीच सांगितले नाहीस।
आता दूर गेलास तू,
माझे मनही राखले नाहीस।