रात्रीच्या गर्भातून
रात्रीच्या गर्भातून


रात्रीच्या गर्भात आता,
अंधार दाटला आहे।
सूर्य तो मावळून आता,
बराच काळ लोटला आहे।
शांत झाले सगळे काही,
डोळ्यावर झोप आहे।
तरीही जागून रात्र ती,
मी तुझीच वाट पाहे।
पक्षी घरट्यात निजले,
आभाळाने शाल पांघरली।
तूच तो स्वप्नात माझ्या,
मीच आता भांबावली।
रात्रीच्या धुक्यात मजला,
तूच पाहिजे जवळी।
हट्ट माझा समज सख्या तू,
ये मजसाठी धावूनी।
रात्र सरत नाही तोच,
एक चांदणी दिसली।
नजर ती सुखावली,
तुझीच प्रतिमा ती भासली।