STORYMIRROR

Sakshi Shintre

Tragedy

3  

Sakshi Shintre

Tragedy

अस्थिर जीव...

अस्थिर जीव...

1 min
222

न आठवे आज मज काही,

आठवणी निघून गेल्या।

अंतरीच्या पोतडीत माझ्या,

शब्दही न तो ठेवला।

कशी होणार ती कविता,

न उरले काही माझ्याजवळी।

कोरे मन आज झाले,

अश्रूही डोळा न येई।

निःशब्द होती मुख माझे,

न कुणासही ते कळे।

चित्र आज मनात माझ्या,

कोरा कागदच तो असे।

कधीकाळी हृदयात माझ्या,

भावनांना पूर होता।

आज भावनाच विरल्या वाऱ्यावरी,

अस्थिर तरीही शांतता।

न लाभली कधीच मला,

अशी ही जीवघेणी पोकळी।

मन तरीही आज कातरले,

अश्रूधारा शेवटी ओघळली।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy