चल रे गड्या घरी चलू ...
चल रे गड्या घरी चलू ...
1 min
355
चल रे गड्या घरी चलू ...
थवा उडे भुरू - भुरू ...
वाट घरट्यांची धरुनी जणू !
चुकली नाही ना पाठी कवणू ?
चल रे गड्या घरी चलू ...
वारा वाहे झुळू – झुळू ...
सूर्य लपला ढगा आडु !
डाव शोधण्याचा कुणा वरु ?
चल रे गड्या घरी चलू ...
कशी आकाशी झाली जादू ...
धांदल त्यांची झाली सुरु !
आभाळाला कसा रंगवू ?
देईल आई गोड – गोड खाऊ ...
गोष्टी ऐकत रमूनी राहू ...
कुशीत तिच्या निजुनी जाऊ !
चल रे गड्या घरी चलू ...