Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Amrut Shivaji Dalvi

Others

5.0  

Amrut Shivaji Dalvi

Others

नको वाटत कधी – कधी ...

नको वाटत कधी – कधी ...

1 min
286


हृदयहीन जगात वावरताना ,

स्वतः ही निर्दयी होणं ...

नको वाटत कधी – कधी ...


यालाच मोठं होणं म्हणतात का ?

पडतो प्रश्न कधी – कधी ...


भीती वाटताच आठवणारी ,

ती उबदार कुशी आईची ...

सरताच सावली संकटाची ,

ती वाहावी नकोशी !!!

नको वाटत कधी – कधी ...


जगाशी कसं वागावं ?

की जगाला कसं सजवावं ?

पडतो प्रश्न कधी – कधी ...


वाव द्यावा सौंदर्याला , असं वाटताच !

पाहून त्यातील दंभाला ,

नको वाटत कधी – कधी ...


लोकांच्या चेहेर्‍यांचे खोटे चेहरे ,

आपल्याला ही घालावे लागतील ...

त्यांच्या पायांतील वाकड्या वाटा ,

आपल्याही वाटे येतील ...


त्यांच्या प्रमाणेच आपलं ही ...

बालपण हरवून जाणार , हे कळताच ...

नको वाटत सारं काही ...


Rate this content
Log in