प्रेम
प्रेम
प्रेम व्यक्त करण्यासाठी
कुठलाही दिवस नसतो
असा खास
प्रत्येक श्वासात, क्षणात असतो
त्याचा आभास
प्रेमात नसतो कधीच दुरावा
प्रियजनाच्या नुसत्या आठवणीने फुलतो
तनंमनी बेधुंद मारवा
प्रेमाला नसते कधी ओहोटी
नुसत्या नजरेनेच येते
आसवांना भरती
प्रेम असते जगावेगळे
शब्दांच्या पलीकडले
क्षणात वाटते जणू
सारे तारांगणच धरतीवर अवतरले.
सौ रेवती प्रशांत शिंदे.

