विठूराया
विठूराया
विठूराया
विठू माझा नाही एकला
तो तर बाई लेकुरवाळा
अंगी खांदी घेतले
त्याने संतमंडळा !!
विठू माझा हरी
आहे बाई संसारी
शोभे त्याच्या शेजारी
माझी रखुमाई हासरी !!
भक्तांसाठी बाई
तो काय काय करी
दळण कांदन करी
जनीच्या ग घरी !!
संताद्वारे देई
भक्तीची शिदोरी
युगे अठ्ठावीस उभा
पुंडलिकाच्या विटेवरी !!
अशा विठूची
करावी वारी
साऱ्या संकटातून
तोच बाई तारी !!
!!विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!!
सौ रेवती प्रशांत शिंदे.🙏🙏✍
