पाऊस
पाऊस
पाऊस असा
पाऊस तसा
कधी हळूवार
रिमझिम बरसणारा
कधी वाऱ्यासोबत
सैरावैरा पळणारा
पाऊस असा
पाऊस तसा
कधी मधुर संगीत गाणारा
कधी विजे सोबत
तांडव करणारा
पाऊस असा
पाऊस तसा
कधी डोळ्यातील
पाणी आटवणारा
सर्वत्र पाणीच
पाणी करणारा
तर कधी तोंडचं
पाणीच पळवणारा
पाऊस असा
पाऊस तसा
कवी मनाचा
प्रियजनांना रिझवणारा
सर्वांना हवा हवासा
सौ रेवती प्रशांत शिंदे.
