पाऊस असा पाऊस तसा
पाऊस असा पाऊस तसा
1 min
7
पाऊस असा
पाऊस तसा
कधी हळुवार
रिमझिम बरसणारा
कधी वाऱ्यासोबत
सैरावैरा पळणारा
पाऊस असा
पाऊस तसा
कधी मधूर संगीत
गाणारा
कधी विजेसोबत
तांडव करणारा
पाऊस असा
पाऊस तसा
कधी डोळ्यातील
पाणी आटवणारा
कधी सर्वत्र
पाणीच पाणी करणारा
तर कधी तोंडच
पाणीच पळवणारा
पाऊस असा
पाऊस तसा
कवी मनाचा
सर्वांना हवाहवासा
