STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

प्रतीक्षा

प्रतीक्षा

1 min
304

तुझी किनारी सायंकाळी वाट पाहतो गं

वसुंधरेचा निसर्ग सुंदर थाट पाहतो गं


मन मोहक तो देखावा बघ क्षितीजावरी गं

तुझ्याच साठी रंग उधळले आकाशांती गं


अशांत सागर तुजला हाका आर्त मारतो गं

उसळे लाटा प्रचंड वेगे मजला छळती गं


सूर्य निवळला थंड जाहला जलात बुडतो गं

चंद्र उगवला तारा फुलल्या तुझ्याच साठी गं


तुझी न माझी प्रेम कहाणी लिहून टाकू गं

सोनेरी क्षण ही तुझ्या हृदयी कोरून ठेव गं


एका क्षणात सागर सारा पिऊन घे ना गं

एका क्षणात जीवन सारे जगून घे ना गं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance