STORYMIRROR

Jyoti Sakpal

Romance

3  

Jyoti Sakpal

Romance

माझ्या न कळत

माझ्या न कळत

1 min
206

गंध फुलांचा चहू दिशांना दरवळत होता

माझ्या न कळत तो जवळ येत होता

गुंतलेली केसांची बट बाजूला करत मी मागे वळून बघितलं

त्याच्या नजरेला नजर भिडताच त्याने लगेच विचारलं 

खूप प्रेम करतो तुझ्यावर माझी होशील का

तुझा होकार तुझ्या कवितेतून देशील का

धडधडणाऱ्या हृदयाला तेव्हा काहीच नाही सुचलं

   मला त्या क्षणाने जणू मंत्रमुग्ध केलं

मी काहीही न बोलताच त्याला सर्व समजलं 

लाजत मुरडत मी त्याला हळूच  दूर लोटलं  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance