पहाट आठवणींची...
पहाट आठवणींची...
प्रेमाच्या वेडेपणाचा सुगंध पसरे सूर्यप्रकाशा सोबतीला,
आठवणींच्या जाणिवेनं देई जाग प्रहरीला,
होतो उत्कट भाव त्याच्या जाणिवेने,
पडते पाऊलं पुढे घ्यावयासी आलिंगनात...
---
गोड हास्य घेउनी आज सुर्य पुन्हा उगवला, तुझ्या एका झलकेने ढगाआड लपविला,
तुला पाहण्यास वसंतावरी मात करुनी वर्षा ऋतु प्रगटला, त्यास स्मित हास्य देत सुर्य नव्याने उगवला...
---