बंध भावनांचे
बंध भावनांचे
लाजण्यातला देखणेपणा आणि देखणेपणातल लाजणं,
सुरेख जुळून येत जेव्हा "सौ" हे आनंदाने स्वीकारलं जात,
म्हणतात ना प्रेमाला काळ, वेळ, वय याच बंधन नसतं,
म्हणूनच प्रेमाच नातं हे नेहमी तरुण असतं...
----
तुला पाहताना फक्त तुझ्या डोळ्यांत पहावंस वाटतं,
कधी त्या ओलाव्यात स्वतःला भिजवावं
तर कधी खोल बुडावस वाटतं,
भावनांच्या दुनियेत टचकन येणार पाणी,
मोत्यासारख जपावंस वाटतं...
---
आमच्या "सौ" म्हणजे जणू लाजळूच झाड,
नुसतं प्रेमाच्या शब्दांनी होतात घायाळ,
लाडीक नको म्हणुन जवळ घे म्हणणं,
आमच्या "सौ" शिवाय कुणालाच नाही जमणं,
आमच्या "सौ" अभिमान आहे माझा,
कोणता गुण नाही ते शोधून सांगा,
मला वात्रट म्हणत नटतात अशा भारी,
की मॅचिंगच्या परीक्षेत गाठतात शंभरी,
आपसूक घेतात माझ्या मनाची काळजी,
नको नको म्हणत देतात घट्ट सुखाची आळंदी...
---
किती नाजूक असतात प्रेमाचे शब्द, जिवलगाच्या दोन ओळीही करतात हृदयाला स्पर्श,
आपल्यावरही कुणी इतकं प्रेम करत, यासारखं सुखं तरी काय असतं,
कुणी कुणाची वेळ काढुन वाट पहाणं, यासारखं भाग्य ते दुसरं काय असतं...
---
कसा हा जिव्हाळा जिव लावीत जातो, तुझ्या नि माझ्या भेटीस समीप आणितो, कसा हा जिव्हाळ दोन जिवांचा मेळ, प्रेमाच्या त्या जिवांना मायेचं पांघरूण...
---

