मी "सौ"
मी "सौ"
का कुणास ठाऊक कसा पार केला मी प्रवास,
आपुल्या जीवघेण्या जीवांसंगे,
ना कधी पाहिले प्रहरी किरणांना,
ना दिसला कधी तो सोनेरी किनारा...
आयुष्य वेचिले ज्या कुणांसाठी,
वळून ना पाहिले कधी तयांनी,
झिडकारून दाखविला फक्त बहाणा,
तुझे तूच भोग म्हणूनी...
कळला ना कधी सात फेऱ्यांचा अर्थ,
भोगिले समजून आयुष्याचे प्राक्तन,
स्वकीयांच्या अपेक्षेपोटी ओतला मी जीव,
का कुणास ठावूक कसा पार केला हा प्रवास...
