स्वतःशी भेटणं...
स्वतःशी भेटणं...
तुझ्या डोळ्यातली माझी आठवण, अंगावर शहारा आणते,
शब्दांशिवायही असतो भाव गहिरा त्याची जाणीव करून देते..
तुझ्या डोळ्यातली माझी ओढ वेड लावून जाते,
भेटीसाठी आसुसल्या जीवाची भेट घडवून देते...
हृदयाच्या कणाकणात बहरलेलं प्रेम,
आणि बहरलेल्या प्रेमाची त्या चातकाप्रमाणे वाट पाहणं,
म्हणजे तुझं स्वतः स्वतःशी भेटणं...

