STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

शुभ्र चांदणे

शुभ्र चांदणे

1 min
215

शुभ्र चांदणे काळ्या रात्री गं

तारे बघ ते लुकलुकणारे गं


तोड मनाचे बंधन सगळे गं

मौन तनाचे भंग पावले गं


चंद्र लाजला तुला पाहता गं

बघ तो लपला ढगामागून गं


मेघ काळसर कसा बरसला गं

तुझ्या भेटीस जीव तरसला गं


धुंद वाहतो पवन बावरा गं

हवेत आहे मंद गारवा गं


स्पर्शात तुझ्या वीज कडाडली गं

तुझ्याच मिठीत रात्र संपली गं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance