मिठी ती मंतरलेली
मिठी ती मंतरलेली
आठवते भेट सारी
आठवण होत राही
कधी पडलो प्रेमात
मनातच वाट पाही
दिन ते मंतरलेले
स्वप्नी येतात अजून
पावसात भिजायला
कसं जायचो आपण
आज ही आठवतात
क्षण ते मंतरलेले
क्षण तुझे माझे सखे
प्रेम रंगात रंगलेले
दिले घेतले वचन
सांग मनातील काही
बोलायचे सांगायचे
तुज आहे किंवा नाही
नित्य निरंतर राहो
प्रेम मनात आपुल्या
किती तरी प्रश्न सारे
अन् शपथा घेतल्या

