STORYMIRROR

Manisha Awekar

Romance

3  

Manisha Awekar

Romance

ही वाट...

ही वाट...

1 min
202

ही वाट धुंद ओलेती

हात हातात गुंफती

प्रीती अजाण अबोल

गूज स्पर्शाने वदती


केस ओलेते आवरी

हळुवार बटा सारी

सुख ओलेत्या वस्त्राचे

पुन्हा पुन्हा ती सावरी


त्याची चोरटी नजर

फिरे अंगोपांगावर

होई लज्जा अनावर

लाली गाली मुखावर


भाग्य ओलेत्या वाटेचे

मने तिथेच जुळली

प्रीत मनी उमलली

नाती जन्माची जुळली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance