तूच माझी राणी
तूच माझी राणी
बेजार झाला जीव
काय सांगू माझी मी कहाणी
भलं भलं तेच बोलतेरे ती
दादांनो माझी मला राणी
उठता बसता तिचा धाक
बोलून भर म्हणते पाणी
स्वयंपाक बनऊन ती
अन हातात देते माझ्या घासणी
काय सांगू दादा मी तुम्हाशी
माझ्या जीवाचीही परीशानी
ऐकत नाही काहीच माझं
कितीही करून तिला विनवणी
छंद तिचे पुरवून पुरवून
झालो राजाचा रंकावाणी
ठेऊन मला पायथ्याशी
चोप म्हणते पाय माझी राणी
सदा तिचा हट्ट तट्ट अन वट्ट वट्ट
सांगा समोजोनी तीस कोणी
धुणं ही कसं धुऊ तीच मी
प्रत्येक काम मलाच लावते ती राणी
लेकरं बाळा माझे
संभाळावे कसे मी एकट्यानी
थाट तिचा वेगळाच
जणू एखादी ती महाराणी
दिसायला ती काळी
पण भरवते तोंड मेकअपानी
गेली गुलाम गिरीतच तिच्या
माझी सारी ही जवानी

