विसरताच येत नाही.....
विसरताच येत नाही.....
काही आठवणी अश्या असतात
कधी विसरताच येत नाही .....
मनातले भाव काही केल्या,
ओठांवर येतच नाही ......
दिवसामागून दिवस येतात आणि जातात
पण मन कुठे लागतच नाही....
सुटला कधी अश्रूंचा बांध तर ,
सावरताच येत नाही.....
डोळ्यातील अश्रूंच्या गर्दी मध्ये ,
आठवणीचे आभाळ कधी मोकळे होतच नाही...
कितीदा हदयाला मी प्रश्न केला ?
पण त्याला कधी उत्तर देताच आले नाही......
आठवणीचा गुंता नकळत माझ्यासाठी कोडच बनून राहिले,
तो कधी सोडवताच आला नाही....
विसरावं म्हटलं तर ,
कधी विसरताच येत नाही.......

