STORYMIRROR

Satish Wadekar

Classics

3  

Satish Wadekar

Classics

भेट

भेट

1 min
28.6K


भेट पावसाची होता

पांडुरंग आठवतो ।

गळाभेट घेऊनिया

त्याला मनी साठवतो ।।1।।


माझा सावळा विठ्ठल

मेघगर्द आषाढात ।

भर पावसात भेटे

भुईवर, आकाशात ।।2।।


देई मला तो दर्शन

अशा अनोख्या रूपात ।

इतरांना ना कळते

त्याचे माझे हे गुपित ।।3।।



ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Classics