STORYMIRROR

Satish Wadekar

Classics Inspirational Tragedy

3.1  

Satish Wadekar

Classics Inspirational Tragedy

पांडुरंगाचे उत्तर

पांडुरंगाचे उत्तर

1 min
30.8K


पंढरीची वारी ।

स्तिमित जाहली ।

पाहत राहिली ।

अघटित ।।१।।


विचारू लागली ।

ती रुक्मिणीमाय ।

झाले असे काय ।

पांडुरंगा ।।२।।


धावत जे आले ।

पांडुरंग त्वरा ।

विचारी सत्वरा ।

रखुमाई ।।३।।


जे न झाले कधी ।

का झाला उशीर ।

पडला विसर ।

आषाढीचा ।।४।।


संतांचा मेळावा ।

चंद्रभागे काठी ।

झाली असे दाटी ।

सज्जनांची ।।५।।


गेला होता कुठे ।

आता तरी सांगा ।

थोर झाल्या रांगा ।

भाविकांच्या ।।६।।


बाप तो जगाचा ।

जड आवाजात ।

सजल नेत्रात ।

उत्तरला ।।७।।


भक्त एक माझा ।

बाप शेतकरी ।

होती त्याच्या घरी ।

अंत्यविधी ।।८।।


क्रूर व्यवस्थेने ।

दिली त्याला फाशी ।

आत्महत्या त्यासी ।

प्रचारिले ।।९।।


त्यालाच पाहाया ।

धावत जो जाई ।

मीही नष्ट होई ।

त्याच्यासवे ।।११।।


त्याच्या सरणात ।

काहीसा जळून ।

काहीसा रडून ।

परतलो ।।११।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics