STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Classics

5.0  

गोविंद ठोंबरे

Classics

कुसुमाग्रज

कुसुमाग्रज

1 min
27.5K


एक सूर्य एक तेज ज्ञानदीप सरस्वती

तेज स्फुल्लिंग तू ऋत्विज अनुभूती

अंधकार पेटवून आशारूप उन्नती

लेखणीत मर्म अन प्रतिभावंत तू कृती


महाकवी महारथी 'कुसुमाग्रज' माऊली

आधुनिक साहित्य अन् मानवतेची सावली

स्थितिकीर्ती लोकमान्य लेखणी भावली

नयनरुपी वाचकांसी शब्दराऊळी पावली


वळण ऐसे कवितेत, नाटकात शोभिले

रसिकांच्या जिव्हाळ्याचे बंध जैसे गुंफले

प्रेमरूपी प्रतिभेचे शब्दकोश माखले

वि.वा.शिरवाडकर नाम जगी गाजले


मूळ तुझे गजानना विष्णूरूप जाहले

शब्द शब्द पान्हा तुझा रसिकांना पाजले

जीवनलहरी, मुक्तायन, मारवा सजविले

दूरचे दिवे ते नटसम्राट दुमदुमले


कल्पनेच्या तीरावर वैष्णव गंध शिंपिले

साहित्यनिर्मितीचे वसे सुयोग्यरूपी पेलले

ज्ञानपीठ, साहित्य अकादमी ना ना रंग रंगले

प्रेम, समता, बंधुता त्रयींचे सुप्त जगी पेरले


ऐसा कवी, नाटककार, कथामृत, साधना

भिंत भिंत मानसी कृतकृत्य वंदना

मज मनी भान यावे मनोमन आर्तना

कुसुमाग्रज अंगी यावे हीच खरी प्रार्थना



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics