STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Classics

3  

SURYAKANT MAJALKAR

Classics

जगण्यात मौज आहे

जगण्यात मौज आहे

1 min
28.4K


उसळणार्‍या लाटांचे तुषार झेलीत अंगावर

फेसाळलेले दु:ख विरण्यात मौज आहे

जगण्यात मौज आहे


तो कालचा प्रवासी थकून विसावलेला

मैलोन् मैल चालून संतोषात मौज आहे

जगण्यात मौज आहे


जन्मली रक्ताची नाती, जमवली अनेक ती

फुटल्या अनेक वाटा, सदिच्छात मौज आहे

जगण्यात मौज आहे


सोबतीस सावली, सावली तिमाराधीन झाली

अंधार सोबतीस, एकांतात मौज आहे

जगण्यात मौज आहे


विसाव्यातील पाखरे, गगन-भरारी झाली

नजरेआड होईतो, पाहण्यात मौज आहे

जगण्यात मौज आहे


देवातील देवपण, पुसता झालो देवाशी

अजाणता रुपास, भजण्यात मौज आहे

जगण्यात मौज आहे


लिहुन झाले इतुके, वाचण्यात अर्थ काही ?

माफी असावी मजला, लिहिले काहीबाही

लिहिण्यात शोध आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics