STORYMIRROR

Varsha Chopdar

Classics Inspirational

3  

Varsha Chopdar

Classics Inspirational

अभंग

अभंग

1 min
29.4K



टाळ मृंदूगाला

साथ चिपळ्यांची

लाभली संतांची

परंपरा |१|


अंधार गडद

दावाय उजेड

उघडी कवाड

संतवाणी |२|


चक्रधर सांगे

अनुभवायचे

दाखले द्यायचे

यथोचित |३|


म्हादंबा येवूनी

धवळील्या दिशा

सारूनिया निशा

सोबतीने |४|


ज्ञानदेवा मागे

पसायदान हे

ईश्वराला पाहे

दिव्यत्वाने |५|


संत जनाईची

कथाच आगळी

विठ्ठलाची खुळी

जळीतळी |६|


संत रामदास

बोल ते बोधाचे

श्लोक हे मनाचे

सर्वमुखी |७|


जातीभेद नको

अस्पृश्याचे पोर

घेई कडेवर

एकनाथ |८|


संत तुकाराम

गाथा ही सुंदर

सांगितले सार

जीवनाचे |९|


संत नामदेव

खाण ही ज्ञानाची

जागृती जनांची

सीमापार |१०|


महाराष्ट्र भूमी

पावन धरती

संतांची महती

तेजोमय |११|



ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Classics