STORYMIRROR

Prof. Dr.Sadhana Nikam

Classics Inspirational

4.6  

Prof. Dr.Sadhana Nikam

Classics Inspirational

बाप

बाप

1 min
29.3K


तुझं इवलसं पाऊल

करंगळीच्या स्पर्शान ज्याच्या

पावलावर पाऊल टाकतंं

तो एक बाप असतो


शाळेची पाटी गिरवली जाते

शब्द 'अ' आईचा उमटतो

पण शब्दांना आकार देणारा

तो एक बाप असतो


पोटाला चिमटा देऊन जो

आयुष्याची राखरांगोळी करतो

मनाला दिलासा देत जो

हसतमुखाने दुखः झेलतो

तो एक बाप असतो


स्वप्न भविष्याची पाहतो

यशाने भारावून जातो

अपयशाने न खचता

ठेचाळलेल्या अंतःकरणाने

आयुष्यभर कृतार्थ ठरतो

तो एक बाप असतो


माय जरी जन्माची शिदोरी

बाप घराची सावली असतो

विसरून हे चालणार नाही

कारण तो एक बाप असतो

तो एक बाप असतो .


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Classics