आपला महाराष्ट्र
आपला महाराष्ट्र
आपल्या महाराष्ट्रात
आहे परंपरा संतांची
गुरू, महंतांची
थोरांची...
सह्याद्री, सातपुडा
गोदावरी, चंद्रभागा, भीमा
पसरली सीमा
महाराष्ट्राची...
महाराष्ट्राची राजधानी
मुंबई, मनाची राणी
निळेशार पाणी
समुद्राचे...
महाराष्ट्राची मायबोली
मातृभाषा मराठी आमची
लाडकी सर्वांची
मराठी...
एकजूट साधूया
बनवू महान राष्ट्र
आपला महाराष्ट्र
देशप्रेम...
