STORYMIRROR

मिनाक्षी नागराळे

Classics

3  

मिनाक्षी नागराळे

Classics

क्रांतीसुर्य

क्रांतीसुर्य

1 min
29.2K


*हायकू काव्य प्रकार*

ज्योतिबा फुले

स्त्रीमुक्तीचे जनक

झाले पालक...

अनिष्ट प्रथा

 केल्या दूर सारून

शिक्षणातून....

ज्ञानज्योत जी

पेटवलीत तुम्ही

अज्ञानी आम्ही...

शिक्षण कार्य

खूप अनमोल ते

केले खुले ते...

ज्योतिने ज्योत

 पेटवीली नारीस

केले परीस...

तुमच्यामुळे

शिकलो आम्ही स्त्रिया

पडतो पाया

ज्ञान मान तू

दिले आम्हांस छान

ज्योति महान...

क्रांतीमशाल

पेटवू रचलास

 हा ईतिहास...

जातिभेद रे

दूर सारिलास तू

जाणलास तू...

धन्य धन्य तू

क्रांतीसुर्य महात्मा

मुक्त आत्मा

न्याय दिलात

स्त्रीयांना रक्षण

स्त्री आरक्षण

शब्दच फुले

घ्या तुमच्या चरणी

मी आहे ॠणी...

शिक्षणरूपी

वसा ध्यानी ठेवावा

प्रणाम घ्यावा....


Rate this content
Log in

More marathi poem from मिनाक्षी नागराळे

Similar marathi poem from Classics