STORYMIRROR

Ashita Chitnis

Others

4  

Ashita Chitnis

Others

सारीपाट

सारीपाट

1 min
303

कांही जिंकले कांही हरले,

सारीपाटास हे रोजचेच झाले


तेच राजे तिच प्यादी

नेहमीचीच ती वादावादी

युद्धासम हे किती सामने

या पाटावर लढुनी गेले

सारीपाटास हे रोजचेच झाले


घोडे उधळले, हत्ती धावले

उंटही रणांगणावर उतरले

चौकोनाच्या भिंतींमागे

पुन्हा सापळे रचले गेले

सारीपाटास हे रोजचेच झाले


चौकोनी या आयुष्याची

अशीच कहाणी असते रोजची

कितीदा हरावे, तरी लढावे

डाव कितीही धुळीला मिळाले

सारीपाटास हे रोजचेच झाले


नियती ही सारीपाटासम

अन हत्ती घोडे जणू बुद्धिमती

चालवणारा तो एकच मात्र

गणित त्याचे न कोणा कळले


कांही जिंकले कांही हरले,

सारीपाटास हे रोजचेच झाले


Rate this content
Log in