STORYMIRROR

Saroj Gajare

Fantasy

3  

Saroj Gajare

Fantasy

वसंत फुलला मनोमनी '

वसंत फुलला मनोमनी '

1 min
713


दिनकराने धरेवर अंथरली

मखमली चादर शेंदरी ।।


व्योम अंगणी रंगपंचमी

रंगली लाल केशरी ।।


चालल्या नटूनी ललना

पुजारती वसंत स्वागता ।।


मांगल्याचा घंटानाद

वाजे दूर मंदिरात ।।


चैत्रा अंगण सजले छान

रंग रांगोळी रेखाटन ।।


सडा प्राजक्ती पडे द्वारी

वसंत फुलला मनोमनी ।।


दारावरच्या जाई जुई ही

चाफा मोगरा गन्ध अंगणी ।।


धुंद मोहर तो आम्रतरुचा

गोड सूर कोकीळ कुजनाचा।।


सख्या भेटता ग साजणी

झुले झोपाळा तो अंगणी ।।


गुढ्या तोरणं ही सजली

चैत्र पालवी ही फुटली ।।


फुलपाखरे वर भिरभिरती

मोहरली फुलाची पाकळी ।।


सण येता रंगीत होळी

माहेरी येती लेकी बाळी ।।


खेल रंगती अंगणी

फुगड्या घालती मैत्रिणी ।।


पुलकित सृष्टी सर्वांगी

वसंत पळसही फुलवी ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy