STORYMIRROR

Saroj Gajare

Others

3  

Saroj Gajare

Others

एखाद्या सणाची आठवण "

एखाद्या सणाची आठवण "

1 min
344


वीस पंचवीस जणांचं आमचं कुटुंब

दिवाळ सणाला येत असू एकत्र

लाडू , चकली , चिवडा ,शेव

फराळ बनवण्याचे सुरू होई सत्र //१//


दिन कधी उगवे न मावळे

काहीच कळत नव्हते

फुलपंखी दिवस दिवाळीचे

भुर्रकन उडून जात व्हते //२//


अशीच एक आठवण

अंगणात जमले होते सर्वजण

फटाक्यांचा आनंद घेत

आटोपून सर्वांची जेवणं //३//


भाच्यानं उडविले भुईनळं

अलगद शिरलं ते माझ्या नव्या कोऱ्या साडीत

तीन चार भोक पाडत न मी नाचत

अशी ती साडी आठवणीत राहिली पडद्यांच्या रूपात //४//

(अशी ती साडी जाऊन बसली माझ्या हृदयाच्या कप्प्यात )



Rate this content
Log in