Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Saroj Gajare

Others

4.3  

Saroj Gajare

Others

बिरड्याची उसळ

बिरड्याची उसळ

1 min
413


महाराष्ट्राची प्रसिध्द आहे, चमचमीत मिसळ

पण मला आवडते खूप, बिरड्याची उसळ//१//


मसूर, मटकी, मटार, मूग, नाना असती मिसळी

पण बिरड्याची उसळ भारी, आहे वेगवेगळी //२//


आठवांच्या कप्प्यात एक , जपली गेलीय उसळ

कारण एकदा बिरडे काही केल्या शिजेना सरळ //३//


येणार होते खास पाहूणे , खाण्यास उसळ

उसळीने केला रसभंग , दाणे दगडासम कडक //४//


चावून चावून बिरडं, जिभेवर आले फोड

अन अंगावर रोंगटे, काहीच लागेना गोड //५//


शेवटी डाळींब्या काढून, मसाल्यात घातल्या शेंगा

अन शेवग्यानं दाखवला, बिरड्याला ठेंगा //६//


अशी झाली फजिती, अन बिरडं राहिलं आठवणीत

आवडता पदार्थ मग गेला हो नावडतीत //७//


Rate this content
Log in