आठवण
आठवण
आली मज आठवण
माझ्या पहिल्या लिखाणामागची
डोळे आलेत भरून
साठवण ह्दयातील कवितेपुढची //१//
आठवती मजला ते
शाळेचे फुलपाखरी दिवस
मन गिरकी उंच भरारी
पंख पाकोळी भिडे नभास //२//
दिली होती मज प्रेरणा
प्रिय कुलकर्णी मॅडमनी
शालेय मासिकासाठी तू
काव्य लिहावे सरोजिनी //३//
बाईंची मी लाडकी , हुशार
विद्यार्थिनी वर्गातली
त्यांच्या प्रोत्साहनामुळे
माझी पहिली कविता प्रसवली //४//
मी एक गरीब कृषक कन्या
लिहिले काव्य " ह्दयातील शेती "
बी पेरले मी, प्रेम, ज्ञान अहिंसेचे
पिक आले विचारधनरुपी मोती //५//
स्वार्थी वासनांची तणे उपटून
पश्चातापाचे पाणी पाजून
पसा पसा धान्य दान करून
आलेले भरघोस पिक दिले मी वाटून //६//