Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Saroj Gajare

Others

3  

Saroj Gajare

Others

नवपंख

नवपंख

1 min
437


सारे आकाश माझे अन, मी अवकाशा कवेत घेते

बुद्धी, शक्ती, कौशल्यक्षमता, मी नित्य वाढवित नेते//ध्रृ//


समर्थ, परिपूर्ण मी नवविध कला गुणांची खाण

माझ्याविना फुलत नाही, घरा-दारातलं सुख पान

करते मी जीवन सुंदर, नवपंख स्वप्नांना देते//१//


गतस्मृतींच्या जोखडातून मी अलगद मुक्त होते

छोट्याशा क्षणस्वप्नांचे सप्तरंगी इंद्रधनू विणते

मी गार्गी, मैत्रेयी, वीरांगना; मीच सावू-जिजाऊ होते//२//


कित्येक नात्यांचे बंध रेशमी, तरी जुळवून घेते

त्या बंधांनीच जीवन माझे, समृद्धही करून घेते

आकाशाला गवसणी घालण्या, मी दृढनिश्चयी होते//३//


येता वेळ, होते आक्रमक, मी झाशीची राणी शोभते

शूर मर्दानी, मीच चंडिका, जगती डंका मिरवते

कुंभारासम सुसंस्कारे मीच, मुला-बाळा घडवते //४//


सर्वक्षेत्री मम आघाडी, उच्च विद्या विभूषित होते

स्वाती, उषा, मेरी, लता, फायटर पायलट बनते

अनाथांचे पुसूनी अश्रू मी, सिंधूताई, तेरेसा होते//५//


मेधा, प्रज्ञा, कौशल्यक्षमता, मी नित्य वाढवित नेते//ध्रृ//


Rate this content
Log in