आयुष्यातील भीतीचा प्रवास
आयुष्यातील भीतीचा प्रवास


वाट वळणाची खाचखळग्यांची
होती ती शेतातल्या पांदीमधली
जात होते मी माझ्याच धुंदीत
अनवाणी पायी काॅलेजमधी //१//
ओढ मला होती शिक्षणाची
विचार सतत त्याच्यासाठी
पहिलीच मुलगी मी गावातली
सिद्ध झाली होती काॅलेजसाठी //२//
नव्हत्या कोणत्याच सोयीसुविधा
चिखल माती तुडवण्याचा रस्ता
तर त्या वाटेवरून दोन्ही पायातून
सरपटत गेला मोठ्ठा नागोबा //३//
लक्षात आल्यावर बसली पाचावर
गोठले मी जागच्या जागीच
अन आईचे शब्द आठवताच
केला नमस्कार भानावर येताच //४//
तसे तर नवल नव्हते सर्पभेटीचे
शेतांमध्ये अन येता जाता भेटला होता बाप्पा
प्रत्येकाला देवाने पाठवलंय श्वास मोजून
अस्तित्वात कोठे ना कोठे आहे देवबाप्पा //५//