Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Saroj Gajare

Others


3  

Saroj Gajare

Others


बालवाडीतील आठवण

बालवाडीतील आठवण

1 min 237 1 min 237

होतं खूप मजेदार

आमचं बालपण

घरं होती खूप लहान

खेळायला मोकळं मैदान //१//


शाळेचं होतं

भारीच आकर्षण

वयं वाढवून मग

झालं शाळेत पदार्पण //२//


अक्काचं बोट धरून

गेले होते शाळेला

होतो हसत खिदळत 

बाईंना बघता कुलूप तोंडाला //३//


एकदाचं शाळेत

दाखल झालं नाव

कौतुक भरल्या नजरेनं

चारी दिशेला घेतला ठाव //४//


शाळेची होती

खूप खूप आवड

सुटका होणार होती

गहू तांदूळ निवड //५//


छप्पर गळकी पत्रांची

जमीन माती सारवणाची

जागोजागी होते पोपडे

बिना डेस्क बाकांची //६//


तरीही खूप खूप आवडली

घरच्याच कपड्यात भरली

कुठचा युनिफॉर्म न कुठला डबा

खेळता खेळताच सुटली //७//


Rate this content
Log in