STORYMIRROR

Shantaram Wagh

Comedy Others

3  

Shantaram Wagh

Comedy Others

हरवलेल्या आयुष्यात !

हरवलेल्या आयुष्यात !

1 min
216

हरवलेल्या आयुष्यात

वाट सुखाची शोधतांना

चढून जावे उंच शिखरे

ध्येय आपले गाठताना


साकारावे नवे उच्चांक

स्वप्न साकार करतांना,

जावे क्षितिजा पलीकडे

शोध जीवनाचा घेतांना !


पाषाणाच्या मजबूत भिंती

धीर देती माणसांना,

मानवतेच्या खचल्या भिंती

दुःखात सहारा देतांना !


साथ सुखाची देतो निसर्ग

प्रेम त्याच्यावर करतांना,

वास्तवाशी होतो परिचय

निरभ्र आकाश बघतांना !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy