STORYMIRROR

Shantaram Wagh

Others

3  

Shantaram Wagh

Others

पाऊस !

पाऊस !

1 min
205

चुहूकडे पर्जन्याची

ढगांनी केली गर्दी,

कडाडून विजांनी

पावसाची दिली वर्दी !


वादळाची धावपळ

पक्ष्याची तारांबळ,

अचानक विसवली

रस्त्यावरची वर्दळ !


तापलेल्या धरणीला

तृप्तीचा शिडकावा,

कोसळल्या जलधारा

झाला हवेत गारवा !


आनंदला बळीराजा

ओलाचिंब रानमळा,

झाला चिखल सगळा

पाणी वाहे खळाखळा !


Rate this content
Log in