STORYMIRROR

Shantaram Wagh

Comedy Others

3  

Shantaram Wagh

Comedy Others

माणुसकी !

माणुसकी !

1 min
227

मदतीला होती एकमेकांची साद

कोरोनाने बळावला मनात धाक ,

माणसा-माणसातले वाढले अंतर

विषाणू बनला जीवनाचा विरोधक !


कोरोनाचा होईना निपटारा

दुःख अशांतीचा खेळ सारा,

महागाईचा वाढला पारा

कामधंद्याला नाही थारा !


जीवन मरणाच्या उंबरठ्यावर

येऊन ठेपले जग सारे,

धावपळ करताय कोरोना योद्धा

जीवाला जीवदान देणारे !


विसरून स्वतःचे सुख दुःख

डॉक्टर नर्स सेवाकरी सारे ,

देवदूत बनून संकटाच्या घडीला

माणुसकीची उघडली दारे !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy