STORYMIRROR

Shantaram Wagh

Others

3  

Shantaram Wagh

Others

पाऊस

पाऊस

1 min
199

पहिल्यांदा सुने सुने रस्ते बंद कारखाने

प्रदूषण मुक्त हवेने प्रसन्न झाला वरुण राजा ! !


मोकळ्या रस्त्यावर पावसानं कहर केला

आला सोसाट्याचा वारा संगे पावसाच्या धारा ! !


शेत शिवार भरले पाणी पत्र्यांवर धो धो धारा

झाडावर लपले पक्षी अंगावर येई शहारा ! !


अंधारात कडाडत्या विजासह तुफानी गारा

गावच्या ताळेबंद दुकानाना पाण्याचा घेरा ! !


तापलेल्या धरणीवरती पावसाचा गारवा

धुवून निघावा जगातला व्हायरस सारा ! !


नको अस्मानी संकटं सुखी व्हावा बळीराजा

आषाढीला पांडुरंगा फुलू दे शिवार सारा ! !


Rate this content
Log in