रक्षा -बंधन
रक्षा -बंधन
बाप माझा शेतकरी ! फुलविली शेतीवाडी !
माहेराला बंधू सखा ! उभा राहे पाठीराखा !!
श्रावणात आनंद उत्सव! होई सणास प्रारंभ !!
नागपंचमीचा मान ! झुला घालवितो शीण !!
बालपणीच्या आठवणी! सखी करी हितगूज !!
मिळे रमल्या मनाला ! एक घडीचा विसावा!!
धागा राखीचा बांधला ! दिवा त्यागाचा लावला !!
विनविते देवाला ! माझे आयुष्य दे भावाला !
भाऊ बहिणीची माया ! ओवळीते भाऊराया!!
टळू दे देशाची इडा पीडा ! पडू दे सुखाची छाया!!
सीमेवरच्या जवानाला ! मातृभूमीच्या रक्षणाला!!
एक धागा प्रेमाचा ! पाठविते रक्षाबंधनाला !!
भाऊ माझे किर्तीवंत ! रक्षणास सीमा प्रांत !!
भारतीयांच्या रक्षणार्थ ! आहूती प्राणांची देत !!.
