भगवंत
भगवंत
1 min
146
भगवंता घेतलीस तू सृष्टी हातावर
उभा राहिला जगाच्या पाठीवर,
तू दिलेस सर्व काही भरभरून
आम्ही तुलाच गेलो विसरून !
माणूस त्याच्या कर्माची फेडतोय पापं
तरी भगवंता लोकं तुलाच देई दोष,
कोणाचं वाईट होतांना तू
उघड्या डोळ्यांनी पाहतोस कसं ?
रॉकेटच्या वेगात प्रगतीच्या नादात
संगणक व मोबाईलच्या ओघात,
माणसाचं विज्ञान झालं सर्वस्व
आणि पक्षी जंगल झाडे उदवस्त!
आत्मा,ममता,प्रेम प्रर्जन्य,रक्त
यातच सिध्द करतोय तू तुझं अस्तित्व,
जरी आज दिसत असले धर्मस्थळ ओस
तरी कोरोनाच्या संकटकाळी
अनेकांच्या रुपात तूच धावलास !
