Untitled
Untitled
आठवणीचा प्रवास
सदा असे मनोमन,
विचारांच्या विमानात
कल्पनेचे आसन !
मनी येई परतून
आठवण खोडकर,
आठवणीचा कालवा
जीवालाही हुरहूर !
आठवणीने होई
बुद्धीचे परीक्षण,
मनी खेळते सळते
छळते ती आठवण !
आठवण करी उदास
कधी विसरते भान,
मिळता मनी एकांत
सोबत असे आठवण !
